व्यसनाधिनता म्हटलं कि आपल्या नजरेसमोर येते दारू, तंबाखू ,सिगारेट इ . पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाच्या या युगात आता अशा काही व्यसनाधीनतेची ओळख होत आहे , जे काही व्यक्ती आपल्या वर्तनातून दाखवत आहेत. जसे कि सगळ्यात कॉमन म्हणजे मोबाइल, सोशल मीडिया, विडिओ गेम्स, पोर्नोग्राफी ,इ. गोष्टींचे व्यसन. यांना व्यसन हा शब्दप्रयोग करणं म्हणजे थोडं रिस्कीच. कारण, आपल्यापैकी बहुतांशी सगळेच कमी - अधिक प्रमाणात हे वर्तन दाखवत असतात. पण काही टक्के लोकांना या गोष्टींची इतकी सवय लागते कि त्यापासून स्वतःला दूर ठेवायचं सोडाच पण विचार सुद्धा करू शकत नाहीत आणि आयुष्यातील मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, कौटुंबिक, इ. क्षेत्रात अशा वर्तनामुळे नुकसान होऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा व्यसनाधीनतेचे अजून काही लक्षण आहेत जसे कि या व्यक्तींना मोबाईल किंवा इंटरनेट नाही मिळाल्यास राग ,चिडचिड, अस्वस्थपणा, नैराश्य, चिंता या सारख्या मानसिक स्थितीला सामोरे जावे लागते. याला 'वियोग लक्षणे' असे म्हणतात. या व्यसनाधीनते मध्ये अडकलेल्या व्यक्तींना विशेष असे वर्तन करत असताना वेळेचे भान नसते व दैनंदिन कामकाजा कडे दुर्लक्ष होते. खूप कमी झोपणे, क्वचितच जेवणे, यामुळे झोपेचे आजार (निद्रानाश) व अशक्तपणा जाणवतो. मोबाइल किंवा इंटरनेट व्यसनाधीनच्या या आजारात एखादी व्यक्ती सहज अडकू शकते. सहजतेने व कमी खर्चात होणारी उपलब्धता, जगाशी जोडले असल्याचा गैरसमज किंवा भ्रम, इंटरनेट वापरामुळे मिळणारी उन्मादी आनंद, एकटेपणातून आलेले नैराश्य व चिंतेसारख्या भावनेतून दूर जाण्यासाठी, भावनिक आधाराची कमतरता, पालकांचे दुर्लक्ष किंवा अतिसुट इ कारणे असु शकतात. काही मुला-मुलींना समाजात वावरताना जेंव्हा लोकांशी समोरासमोर बोलण्याची वेळ येते तेंव्हा शरमेची आणि न्यूनगंडाची भावना खूप असते. सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधने, मैत्री करणे इत्यादी प्रयत्न ते करतात व या व्यसनाधीनतेचे बळी पडण्याची शक्यता वाढते. मग सायबर क्राईम सारखे प्रकार पण यामध्ये घडू शकतात.
दक्षिण कोरिया मध्ये इंटरनेट व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप वाढल्यामुळे "Jump Up Rescue School" सुरु करण्यात आले. तसेच २०११ मध्ये Shutdown Law व Cinderella Act काढण्यात आला. ज्यामध्ये रात्री १२.०० ते सकाळी ६.०० दरम्यान मुलांना ऑनलाईन गेम्स खेळण्यांपासून बंदी घालण्यात आली. अमेरिकेत इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्यात आले. जागतिक आरोग्य संस्थेने विडिओ गेम्स च्या व्यसनाला ' मानसिक विकृती म्हणून घोषित केले आहे. १० ते १९ या वयोगटातील मुला - मुलींना हा आजार जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. इंटरनेटच्या व्यसनाधीनतेचा या मायाजालातून बाहेर पाडण्यासाठी त्वरित समुपदेशन व मनोपचारतज्ज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. काही वेळेस व्यसनाधिन व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा समुपदेशनाची गरज भासते.
⇨ व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना पुढील काळजी घेणे गरजेचे आहे:
१. प्रत्येकी एका तासाने १० मिनिटांचा ब्रेक घेणे व इंटरनेट वापराचा वेळ कमी करून ब्रेकचा वेळ वाढवणे (त्यासाठी अलार्म चा वापर करू शकता).
२. बाथरूम, टॉयलेटला जाताना तसेच जेवतेवेळी / जेवताना मोबाईल दूर ठेवणे.
३. मोबाईलचा पॉप उप नोटिफिकेशन बंद ठेवणे.
४. घरामध्ये 'No Mobile Phone' क्षेत्र राखीव करणे इ.
५. कंटाळवाणा वाटल्यावर आपण इंटरनेट किंवा गेम्स चा वापर करता का? एकटेपणा व नैराश्यातून सुटकेसाठी ऑनलाइन जाता का ? याची दक्षता ठेवणे.
६. Digital Diet म्हणजे आपण योग्य त्या संकेतस्थळावर क्लिक करतो का? ते पाहणे.
समुपदेशनासाठी संपर्क ....
- Psychologist Amar Rathod.
Contact- https://manoracheta.co.in/Welcome/Psychologist
11-Jul-2023